घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी आत शिरला आणि रात्रीच्या अंधारात त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.
भोपाळ : मध्य प्रदेशात विवाहितेवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे घटना घडली, त्यावेळी महिला पती आणि मुलांसोबत घरात झोपली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी घरात शिरला, आणि महिला त्याला पती समजल्यामुळे भलताच प्रकार घडला. महिलेला आपली चूक समजताच तिने आरडाओरड केली, त्यावेळी आरोपी पसार झाला.
मध्य प्रदेशात रिवा जिल्ह्यातील मऊगंजमध्ये ही घटना घडली. पीडित महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत घरात झोपली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी आत शिरला. रात्रीच्या अंधारात त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.
लैंगिक संबंध ठेवणारा पती असल्याचा समज
आपल्याशी लैंगिक संबंध ठेवणारा आपला पतीच आहे, असा महिलेचा गैरसमज झाला. रात्रीच्या अंधारात महिला चुकून आरोपीला आपला पतीच समजली. मात्र काही वेळात तिला तो पती नसल्याची जाणीव झाली. त्यासरशी तिने जोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. महिलेच्या किंकाळ्या ऐकून पती आणि मुलांना जाग आली.
गैरसमज दूर होताच आरडाओरड
महिलेच्या पतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला धक्का दिला. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. नवऱ्याने बाहेर जाऊन त्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अंधारात आरोपी कुठे पसार झाला, हे समजलंही नाही. महिलेच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना
दुसऱ्या दिवशी पीडित विवाहिता पतीसोबत पोलिसात गेली. रात्रीच्या वेळेस घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे अज्ञात आरोपी घरात शिरला आणि त्याने अंधाराचा गैरफायदा घेत आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप महिलेने केला. पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पथकं रवाना झाली आहेत.

