राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांचे विनम्र अभिवादन

0 झुंजार झेप न्युज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांचे विनम्र अभिवादन

कोल्हापूर, दि.26: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.