माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारीत आराखडा मान्यतेबाबत त्वरीत कार्यवाही करा- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

0 झुंजार झेप न्युज

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारीत आराखडा मान्यतेबाबत त्वरीत कार्यवाही करा- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

रायगड दि.1 जुलै : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगांव तालुक्यातील गोरेगांव येथे उभारण्याबाबत सुधारीत आराखडा समाज कल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री ना.मा.श्री. धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्हयातील गोरेगांव ता.माणगांव येथील पंचशील बौध्दजन सेवा संघ, या स्वयंसेवी संस्थेमार्फत स्मारक उभारणे व विविध लोकोउपयोगी उपक्रमाबाबत आयोजित करण्यांत आलेल्या आढावा बैठकी दरम्यान श्री. मुंडे बोलत होते. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

श्रीवर्धन राज्य मार्गाला लागून असलेल्या मोजे गोरेगाव येथे पंचशील बौध्दजन सेवा संपाच्या जागेवर 1985 मध्ये संस्थेची इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या बहुउददेशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार निधी देण्यात येणार आहे. या बहुउददेशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वास ही पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव श्री. दि. रा. डिगळे, अवर सचिव श्री.अतिरे, प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त, रायगड श्री. सुनिल जाधव, पंचशील बौध्दजन सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विकास गायकवाड, सचिव श्री. संदिप साळवी इ. मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.