महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन.....

0 झुंजार झेप न्युज

यशवंतराव चव्हाण यांनी कुशल नेतृत्वलोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून रचला आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया - महापौर रवि लांडगे


पिंपरी चिंचवड दि.13 मार्च २०२६-  देशाचे माजी उपपंतप्रधानमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होतेदूरदृष्टीपूर्ण नेतृत्वलोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. त्यांचे कार्यमूल्ये आणि राज्यकारभारातील संतुलित दृष्टी आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबरविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरअतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडेउप आयुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

तर वल्लभनगर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबरविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरमाजी महापौर तथा नगरसदस्य योगेश बहलनगरसदस्या अनुराधा गोरखेवर्षा जगतापफझल शेख,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणेयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळेवैद्यकिय अधिक्षक डॉ. उज्ज्वला आंदुरकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवारडॉ. छाया शिंदेडॉ. शैलजा भावसार, विशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकवैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे, प्रदीप गायकवाड तसेच महापालिका कर्मचारी महासंघाचे अभिषेक फुगे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.