वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

0 झुंजार झेप न्युज

 • महावितरणने वीज खंडित करू नये, वीज बिलात सवलत द्यावी.

मुंबई,नालासोपारा,दि.4 : शहरात लॉक डाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यातच महावितरणचे बिल भरमसाठ येत असल्याने नागरिक ही हैराण झाले आहेत. महावितरणने वीज बिल भरले नाही म्हणून मीटर जोडणी खंडित करू नये तसेच वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रक वसईतील महावितरणाच्या मुख्य कार्यालयात देण्यात आले आहे. 

कोरोनामुळे राज्यात गेले दोन वर्ष लॉकडाउन सुरू असून त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ आली असून सध्याची परिस्थिती पाहता महावितरणने वीज बिलात सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, शिवाय वीज बिल भरले नाही म्हणून वीज जोडणी खंडित करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिका अध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या सचिव रेणुका सचिन जाधव यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन वसई येथील महावितरण कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी सचिव रेणुका जाधव, दुर्गा कांबळे, स्नेहलता कनोजिया व दिलिशा वाघेला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.