सर्वांना कोविड लसीकरण संदर्भात सूचित करण्यात येते की, ज्या दिवशी कोविड लस उपलब्ध असेल त्या दिवशी संबंधित लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेणे

0 झुंजार झेप न्युज

सर्वांना कोविड लसीकरण संदर्भात सूचित करण्यात येते की, ज्या दिवशी कोविड लस उपलब्ध असेल त्या दिवशी संबंधित लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेणे.

सर्वांना कोविड लसीकरण संदर्भात सूचित करण्यात येते की, ज्या दिवशी कोविड लस उपलब्ध असेल त्या दिवशी संबंधित लसीकरण केंद्रांवर सकाळी 8:30 वा. पात्र लाभार्थ्यांनी रजिस्टरमध्ये नाव नोंदणी करून नंबरचे टोकन घावेत. 10:00 वा. ऑनलाईन व्हेरिफिकेशन साठी सुरुवात करावी, टोकन वर व्हेरिफाय ओके लिहिण्यात यावे, त्यानंतर लाभार्थी प्रत्यक्ष लस घेण्यासाठी जाईल. 

लस उपलब्ध आहे, नाही हे तालुक्यावरून आदल्या दिवशी रात्री आपणाला कळविण्यात येते. त्यानुसार मा.वैधकीय अधिकारी नियोजन करून आपल्याला सूचना करण्यात येतात, त्या अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात येते. जेवढी लस प्राप्त होईल, तेवढेच टोकन वाटप करायचे आहेत. सर्वांना विनंती की, संबंधित ग्रुप वरती, खाली कार्यक्षेत्रात, लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्यात यावा. लसीकरणाच्या बाबतीत सुसूत्रता अपेक्षित आहे. दुसऱ्या डोसचे पात्र लाभार्थींना काळविण्यात यावे की, *पहिला डोस घेतलेपासून आज पर्यंत कमीत कमी 84 दिवस पूर्ण झाल्याची खात्री करूनच लसीकरण केंद्रावर लस घेणेसाठी जावे. *नावनोंदणी, व्हेरिफिकेशन, व प्रत्यक्ष लसीकरण* या त्री सूत्री प्रमाणेच कामकाज करण्यात यावे ही विनंती. धन्यवाद!आरोग्य सहाय्यक, श्री.धनंजय लिमजे, PHC WAFGAON.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.