शासकीय तंत्रनिकेतन येथे मिशन युवा स्वास्थ अंतर्गत लसीकरण मोहिम

0 झुंजार झेप न्युज

शासकीय तंत्रनिकेतन येथे मिशन युवा स्वास्थ अंतर्गत लसीकरण मोहिम

वाशिम,दि.26 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार स्वास्थ युवा मिशन अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे 26 ऑक्टोबर रोजी संस्थेतील 18 वर्षावरील पात्र विद्यार्थ्यांचे कोरोना विषयक नियम पाळून कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले. 

मागील दिड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता जनजीवन पुर्वपदावर येत आहे. महाविद्यालयांना देखील वर्ग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये येण्यास इच्छुक होते. मात्र लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नसल्याने अनेकांना हिरमोड झाला. या पार्श्वभूमीवर 18 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात जावून लसीकरण मोहिम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलास मिळाला आहे.

वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे 26 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या चमुच्या मदतीने कोविड-19 लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संस्थेतील सर्व सहा शाखेचे पात्र विद्यार्थी, संस्थेमधील लसीकरण राहिलेले अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचे नियम पाळून लसीकरण करुन घेतले. लस घेतल्यानंतर होणारा त्रास व आवश्यक काळजी या विषयी उपस्थित डॉक्टर व परिचारीकांनी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड, विभाग प्रमुख के.पी. जोशी, एन.एस. विद्यासागर, यु.के. बागडे, कार्यक्रमाचे समन्वयक यु.आर. तोष्णीवाल, सह समन्वयक एन.के. लोंडकर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मिशन युवा स्वास्थ अंतर्गत लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.