“नागरवस्ती विभागाच्या मानधनावरील समुह संघटक कर्मचारी यांना मुदतवाढ द्या.उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना”

0 झुंजार झेप न्युज

“नागरवस्ती विभागाच्या मानधनावरील समुह संघटक कर्मचारी यांना मुदतवाढ द्या.उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना”

पिंपरी चिंचवड,दि.26 : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथील समुह संघटकांना मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथे नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच महापालिका हद्दीतील महिला व बालकांचे कल्याण, दारिद्र रेषेखालील व्यक्ती, गरीब, अपंग व मागासवर्गीय व्यक्तींच्या विकासाकरिता कल्याणकारी योजनांचे महत्वपूर्ण कामकाज करीत आहेत. सद्यस्थितीमध्ये मानधनावरील कार्यरत असलेल्या समुह संघटकांची मुदत नुकतीच संपुष्टात आलेली आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वरील विविध योजनांचा शहरातील नागरीक, विद्यार्थ्यांना विनाअडथळा लाभ मिळणेकामी मानधनावरील कार्यरत असलेल्या सर्व समुह संघटकांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.