चिंचाळा येथे सिमेंट रस्त्याचे विलास बापू भुमरे यांच्या हस्ते भूमिपूजन
पैठण(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): आज पैठण तालुक्यातील चिंचाळा या गावी पंचायत समिती निधीतून सिमेंट रस्त्याच्या कामांचे भुमिपुजन मा अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले , या सिमेंट रस्त्याचे काम आणण्यासाठी विशेष प्रयत्न पंचायत समिती सदस्य लहु पा डुकरे यांनी केले व यांच्या प्रयत्नांमुळे बरेच दिवसापासून न झालेला सिमेंट रस्ता मंजुर करून आणला चिंचाळा ग्रामस्थांनी लहु पा डुकरे यांचे आभार मानले, व लहु डुकरे यांनी सांगितले की भुमरेसाहेब मंञी आहेत त्यांच्याकडून आपण पुढे सुध्दा आसेच विकास कामे मंजुर करून आणु,
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु नाना भुमरे , मा जिल्हा परिषद सदस्य आनिल भैय्या जाधव, युवासेनेचे जिल्हा प्रमुख किशोरभाऊ चौधरी, सरपंच सतीश काळे, मा उपसरपंच सुनिल डुकरे, मा सरपंच बाळासाहेब बोडखे, मा उपसरपंच एकबालभाई शेख,काशिनाथ (जिजा)ब्रम्हराक्षस, तांबे मंगलकार्यालयाचे मालक नितीन तांबे ,श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचे संचालक संपत गांधले , दत्ताञय वाकडे, ग्रा सदस्य बप्पासाहेब येळे,मा ग्रा सदस्य नाना गाभुड, जेधे नाना,शेजुळसाहेब ,मच्छीद्र तांबे,ग्रा सदस्य मानिक नवपुते ,ग्रा सदस्य योगेश गवळी, घावट मामा ,भारत लांडगे ,ज्ञानोबा बोडखे ,आबासाहेब गिरगे,सचिन खरात ,सतीश शिदे, बबलुभाई, गणेश भुकले, हिम्मत दगडखैरे, आबासाहेब खेडकर, प्रकाश वने ,आदी ग्रामस्थ व पञकार बांधव उपस्थित होते, व तसेच या कार्यक्रमाचे सुञ संचालन व प्रस्तावित सुदाम(काका) येवले यांनी केले,
