खानवडी येथे १४ वे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न
पुरंदर(बापू अंबिकर पुरंदर तालुका प्रतिनिधी): क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे मुळगाव खानवडी [पुरंदर ]येथे १४वे राज्यस्तरीय प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.
या संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदी बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या टेकवडे यांची निवड करण्यात आली .त्यांना स्वागत अध्यक्ष पदाचे मानपञ देवून नागरी सत्कार ज्येष्ठ साहित्यिक डा.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी बोलताना अजिंक्य भैय्या टेकवडे म्हणाले की आजच्या तरुणांनी महात्मा फुले यांचा आर्दश समोर ठेवावा .
या प्रसंगी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक सिताराम नरके ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब पवार विजयराव कोलते सुदामआप्पा इंगळे शिवसेना नेते रमेश इंगळे बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनिलतात्या धिवार संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदिप बनकर रविशेठ फुले श्यामकुमार मेमाणे साहित्यिक कवि पञकार दशरथ यादव पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर आदी उपस्थित होते.
