भारतीय संघराज्याच्या ७२ व्या संविधान दिवसानिमीत्त उपमहापौर सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या वतीने अभिवादन!
पुणे : उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून व विकास निधीतून प्रभाग क्र.८औंध-बोपोडी येथे डॉ.राजेंद्रप्रसाद विद्यालय,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला,माता रमाबाई आंबेडकर विद्यालय चिखलवाडी,इंदिरा गांधी विद्यालय औंध,राजर्षी शाहू महाराज चौक,विपश्यना विहार इत्यादी ठिकाणी संविधान प्रास्ताविक स्तंभांची उभारणी करण्यात आली आहे.भारतीय संविधानातील स्वातंत्र्य,समता,बंधुता आणी मार्गदर्शक तत्त्वांचा नागरिकांमध्ये प्रचार-प्रसार व्हावा ही यामागची दृढ संकल्पना आहे.भारतीय संविधान व त्यातील विचारांची मुहूर्तमेढ रोवनारा हा पुणे शहरातील एकमेव प्रभाग ठरला आहे.
भारतीय संघराज्याच्या ७२ व्या संविधान दिवसाच्या औचित्यावर उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वतीने औंध येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन प्रभागातील डॉ.राजेंद्रप्रसाद विद्यालय,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला,माता रमाबाई आंबेडकर विद्यालय चिखलवाडी,इंदिरा गांधी विद्यालय औंध,राजर्षी शाहू महाराज चौक या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करुन संविधान स्तंभास अभिवादन केले.या अभिवादनाची सांगता पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी उपमहापौर सुनिताताई परशुराम वाडेकर रिपाई नेते परशुराम वाडेकर रिपाई शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम,रिपाई शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे,भिमा गायकवाड,आण्णा आठवले,जोयल अन्थोनी,राजेंद्र शिंदे,ज्ञानेश जावीर म.न.पा.विद्यालयांतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
