1/अ व 7/ह प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई !

0 झुंजार झेप न्युज

1/अ व 7/ह प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई !

कल्याण डोंबिवली,दि.30: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली 1/अ प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी मोहना येथील रहिवास नसलेल्या दहा चाळींच्या खोल्यांचे बांधकाम व चार जोते निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई अधिक्षक स्वाती गरुड, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, जूनी डोंबिवली येथील सुरेश भुवन इमारतीच्या बाजूला , भारत माता शाळेच्या मागे बांधकाम धारक सुरेश गायकवाड यांचे राज्य शासनाच्या भूखंडावरील आर.सी.सी फुटिंग आणि कॉलमचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी, 1 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.