20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

 20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर,दि.8: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 20 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, अशी प्रकरणे स्व‍िकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे स्वीकारण्यात येईल. तसेच या महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्व‍िकारण्यात येतील. अर्जाचा नमूना या कार्यालयामार्फत महिला लोकशाही दिनी पुरविण्यात येईल. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.