बीड जिल्हा कचोरी समोर टाक कुटुंबीयांचे व शिवसैनिकांचे उपोषण सुरू !

0 झुंजार झेप न्युज

बीड जिल्हा कचोरी समोर टाक कुटुंबीयांचे व शिवसैनिकांचे उपोषण सुरू !

बीड,दि.7(विश्वनाथ शरणांगत बीड जिल्हा प्रतिनिधी : गेल्या महिनाभरा पासून न्यायलीन कोठडीत असलेल्या संदिप टाक याची सुटका करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी आणि टाक सहकुटुंब उपोषणाला बसले आहेत.

दोन वर्षापुर्वी घडलेल्या बीड शहरातील कृष्ण मंदिर भागात रस्त्यालगत असलेल्या कठडे नसलेल्या एका विहिरीत मोटार सायकल सहित दोन तरुण मृत अवस्थेत आढळून आले होते. सदरील दोन तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. बीड शहर, शिवाजीनगर व पिंपळनेर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना पोलीस प्रशासनाच्या वतीने केवळ त्रास देण्याच्या हेतुने आमच्या संपुर्ण कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न जाणिवपुर्वक होत असून सदरील प्रकरणाचा खरा तपास पोलीस प्रशासनाने करावा आणि सत्य जनता आणि न्यायाल

यासमोर आणावी आणि आमच्या कुटुंबियांची होणारी बदनामी थांबवावी आणि आमचा पुतण्या संदिप जयसिंग टाक (जो की गेली ३२ दिवस जेलमध्ये आहे) त्यास पोलीसांच्या तावडीतून सोडवावे अशी मागणी माजी नगरसेवक रामसिंग टाक यांनी केली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेक्स असलेल्या श्री. टाक यांचा पुतण्या संदिप जयसिंग टाक यास कुठलाही पुरावा नसताना खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. जर दोन दिवसात आमच्या पुतण्याची सोडवणूक न झाल्यास मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी व संपुर्ण संदिप टाक कुटुंबाला घेवून उपोषणाला बसले आहेत.


साधारणत: दोन वर्षापुर्वी कर्नल हिरासिंग टाक व अन्य एक जण बीड शहरानजीक असलेल्या एका विहिरीत मृत अवस्थेत आढळून आले होते. सदर तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून माजी नगरसेवक रामसिंग टाक यांच्या कुटुंबातील राजू महासिंग टाक, संदिप जयसिंग टाक यांच्यावर मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबत पोस प्रशासनाने टाक कुटुंबियापैकी पुरुषांसह महिलांचीही चौकशी केली होती. परंतु त्या चौकशीतून काहीही निष्पन झालेले नव्हते. गेल्या दोन वर्षात टाक यांच्या कुटुंबांना तीन वेळेस चौकशीसाठी नाहक बोलवण्यात आले होते, सदरील गुन्ह्यामध्ये टाक कुटुंबियांचा कसलाही संबंध नसताना पोलीस प्रशासनाकडून केवळ टाक यांची असलेली राजकिय प्रतिमा खराब करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कोणत्यातरी राजकिय दबावापोटी किंवा नाहक प्रतिमा हनन करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरु आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा हा प्रयत्न चालवलेला आहे. गुन्ह्याशी दुरान्वये संबंध नसताना तीन चेळेस चौकशीला बोलावूनही काहीही निष्पन्न होत नसून या खोट्या गुन्ह्यातून संदीप टाक यास वगळण्यात यावे हि मा. जिल्हाधिकारी यानां निवेदन देण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.