लाखनी व साकोली येथील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0 झुंजार झेप न्युज

लाखनी व साकोली येथील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

भंडारा,दि.15: जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज लाखनी येथील तहसील कार्यालय व साकोली येथील उपविभागीय कार्यालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव, मुख्याधिकारी विनोद जाधव, लाखनी तहसीलदार महेश शितोळे, साकोली येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

21 तारखेल्या होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने लाखनी नगरपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. लाखनी येथे मतदान केंद्रावर मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती यावेळी तहसीलदार शितोळे यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी वाहन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अतिरीक्त बस किंवा वाहनांची मागणी आवश्यकता असल्यास ती उपजिल्हा निवडणूक शाखेकडे नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचीत केले. लाखनी येथील पोलीस विभागाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक मनोज वाडीवे यांनी दिली.

पाच दिवसांनी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून साकोली येथील निवडणूक तयारीची संपूर्ण माहिती श्री. कातडे यांनी दिली. यावेळी स्ट्रॉग रूम सुसज्ज असणे गरजेचे आहे. मतदान केंद्र निहाय मनुष्यबळ तसेच मतमोजणीचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेटचे वाटप तसेच प्रशिक्षणाला अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.