डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व मानव कल्याणासाठी -मा सरपंच भागवत तांबे

0 झुंजार झेप न्युज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व मानव कल्याणासाठी -मा सरपंच भागवत तांबे 

विहामांडवा,दि.6 (किशोर धायकर,पैठण प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील ग्रा पंचायत येथे संपन्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व मानव कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन मा सरपंच भागवत तांबे यांनी 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला कामगार, बालकामगार, अस्पृश्य, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व ,त्यात त्यांनी केलेली भाषणे , पुणे करार, अस्पृश्यता निवारण, हिराकुड प्रकल्प, शेतीविषयक ध्येयधोरणे, त्यांनी विविध विषयावर लिहिलेली पुस्तके, संपूर्ण जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहिण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले कार्य हे कोणत्याही एका जातीचा समूहासाठी नसून त्यांनी केलेले कार्य हे मानव कल्याणासाठी आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाला , मा सरपंच भागवत तांबे,शालेय समिती सदस्य दिपक इंगावले , राजेंद्र नाटकर, मा ग्रा सदस्य भिवा ताभुरे,ग्रा लिपीक गणेश गारुळे, कल्याण ढोले,कैलास हातागळे, भैय्या रोकडे ,ग्रा पं कर्मचारी भिमराव मोरे, गणेश मोरे उपस्थित होते.व सुञसंचलन राहुल इंगावले यांनी केले

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.