विहामांडवा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास भाजपातर्फे अन्नत्याग आंदोलन

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास भाजपातर्फे अन्नत्याग आंदोलन

विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): विहामांडवा सर्कल मधील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यास भारतीय जनता पार्टी विहामांडवा सर्कल तर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा पैठण ता सरचिटणीस दत्ता वाकडे व विहामांडवा शहर अध्यक्ष विलास संत यांनी दिला आहे,

यावर्षी विहामांडवा सर्कल मध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी महावितरणकडून शेतकऱ्याचे तोडण्यात येणारे वीज कनेक्शन मुळे शेतकरीआणखीन संकटात सापडला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले ते पुन्हा जोडण्यात यावे नसता भाजपातर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असे निवेदन विहामांडवा येथील सबस्टेशन ऑफिस येथे आपेगाव शाखेचे सहाय्यक अभियंता श्री संतोष सुर्वे ,विहामांडव्याचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश जाधव, तंत्रज्ञ फिरोज शेख, यांना देण्यात आले, या प्रसंगी पैठण ता सरचिटणीस दत्ता वाकडे, विहामांडवा शहर अध्यक्ष विलास संत ,सर्कल प्रमुख डिगाबर नाटकर, शंकरराव धायकर,जिल्हा उपअध्यक्ष विजयसिंह बोडखे,भाजपाचे नेते हरीपंडीत नवथर, भागवत डुकरे ,सुधाकर वाकडे,जगनराजे निबाळकर, पाराजी मोरे ,युवराज बोडखे,आत्माराम ऊरूणकर, पांडुरंग ताडे ,भागवत डुकरे ,सदाशिव बडे, यांची उपस्थिती

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.