अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

0 झुंजार झेप न्युज

•लिलावात एकूण 33 वाहनांचा समावेश

चंद्रपूर,दि.20 : तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे, असे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

सदर वाहन लिलाव दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे तर 29 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता तलाठी कार्यालय, घुगुस येथे करण्यात येणार आहे.

या लिलावामध्ये जेसीबी-1, ट्रक-1, ट्रॅक्टर-18, तीन चाकी ऑटो-9 व हाफटन-4 असे एकूण 33 वाहने लिलावात काढण्यात येणार आहे. वाहन लिलावाबाबत सविस्तर माहिती तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच इतर सर्व माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.