महापालिकेच्या वतीने अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिन साजरा.

0 झुंजार झेप न्युज

अखिल भारतीय सेवा निवृत्त वेतन धारक दिन (पेन्शनर्स डे) कार्यक्रम

पिंपरी चिंचवड,दि.17: पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात्मक जडणघडणीत केंद्र, राज्य, पोलीस, टपाल, रेल्वे, महापालिका अशा विविध खात्यांमध्ये सेवा बजाविलेल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित अखिल भारतीय सेवा निवृत्त वेतनधारक दिनानिमित्त (पेन्शनर्स डे) आयोजित कार्यक्रमांत त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य शितल उर्फ विजय शिंदे, फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहीले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सेवानिवृत्त संघटनेचे पिंपरी चिंचवड संघटनेचे अध्यक्ष दिपक रांगणेकर तसेच केंद्र, राज्य, रेल्वे, पोस्ट, जिल्हा परिषद विविध शिक्षक संघटना, पोलीस, माजी सैनिक, बँक या निवृत्त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी पेन्शनर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. निवृत्ती नंतरचे जीवन आनंदाने आणि आरोग्य सांभाळून जगावे असे त्या यावेळी म्हणाल्या. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्या अपर्णा मोहिले यांनी ज्ञानेश्वरी या विषयावर मार्गदर्शन केले. विविध सेवानिवृत्त वेतन धारकांच्या संघटनांनी त्यांची माहिती सांगितली. 

आज झालेल्या कार्यक्रमात महापौर माई ढोरे यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते निवृत्त कर्मचारी दिपक रांगणेकर, मोरेश्वर देशपांडे, नारायण सोनार, व्यंकटेश पांडे, श्रीकांत मोने, अमृत अबनावे, शांताराम वाळुंज, ए.ए.नायकवाडी, श्रीराम गुरुजी, श्रीमंत लोहकरे, नामदेव तारु, यशवंच चासकर, गणेश विपट, प्रल्हाद गिरगोसावी, अशोक आहिरराव, राजेंद्र पाटील, डी.डी. फुगे, चंद्रकांत झगडे, राम प्रल्हाद शिंपी, विजया जिवतोडे, पुंडलिक जाधव, गोविंद खवासखान, रमेश इनामदार, कुमूदिनी घोडके, कालिंदी डांगे, शैलजा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

सेवा निवृत्त वेतनधारक दिनाचे प्रास्ताविक दिपक रांगणेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि राऊळकर यांनी केले.         

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.