जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

0 झुंजार झेप न्युज

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली,दि.22: जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-2022 साठी वितरीत केलेल्या निधीतून केलेल्या कामाचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी त्यांना मंजूर केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करावा. आयपासचा शंभर टक्के वापर करावा. एकमेकाशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

तसेच सन 2021-22 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाच्या खर्चाचा प्रस्ताव योग्य नियोजन करुन सादर करावा. तसेच ज्या कार्यालयांनी सन 2022-23 चा प्रारुप आराखडा अद्याप सादर केला नाही त्यांनी तात्काळ सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाणीपुरवठा, कृषी, बांधकाम यासह विविध विभागाचा आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.