'शिवराय' आमची प्रेरणा; प्रेरणास्थानाची विटंबना निंदनीय गोष्ट : संकेत चोंधे-पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चातर्फे कर्नाटक येथील घटनेचा निषेध

0 झुंजार झेप न्युज

'शिवराय' आमची प्रेरणा; प्रेरणास्थानाची विटंबना निंदनीय गोष्ट : संकेत चोंधे-पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चातर्फे कर्नाटक येथील घटनेचा निषेध

पिंपरी चिंचवड : कर्नाटक बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा निषेध पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान असून आमच्या प्रेरणास्थानाची विटंबना ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे, अशी भावना भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कर्नाटक बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष अनुप मोरे, तसेच निलेश यादव, दीपक नागरगोजे आदी उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्ष संकेत चोंधे म्हणाले की, शिवाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राला, मराठ्यांची ओळख म्हणजे श्री.छत्रपती शिवाजी महाराज आहेत. श्री. शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत. आमची ओळख, अस्मिता, आमच्या प्रेरणास्थानाला गालबोट लावण्याचे काम कोणी करत असेल तर ती मोठी निंदनीय गोष्ट आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.