डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व मानव कल्याणासाठी - ॲड. राहुल धायकर
विहामांडवा,दि.6: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन विहामांडवा येथील खंडोबा चौकात संपन्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व मानव कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन ॲड.राहुल रघुनाथ धायकर यांनी 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला कामगार, बालकामगार, अस्पृश्य, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व ,त्यात त्यांनी केलेली भाषणे , पुणे करार, अस्पृश्यता निवारण, हिराकुड प्रकल्प, शेतीविषयक ध्येयधोरणे, त्यांनी विविध विषयावर लिहिलेली पुस्तके, संपूर्ण जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहिण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले कार्य हे कोणत्याही एका जातीचा समूहासाठी नसून त्यांनी केलेले कार्य हे मानव कल्याणासाठी आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाला विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित ,आफसरभाई शेख,विक्रम थोटे,मुकेश काला, राजुभाई शेख,सुनिल डुकरे,विजय लंबे,मुन्ना टेलर, विनोद निंबाळकर,पाडुरंग पवार,दिपक गाभुड,सदाशिव ब्रम्हराक्षस,मोहन भाकरे,आशोक टाक,सुधाकर वाकडे, बाळासाहेब येवले,आशोक शेजुळ, राजेंद्र गाभुड,शबीर शेख,शकील शेख,हरीचंद मार्कड, शाम मुरूमकर,आजिज शेख,मानिक नवपुते,विकास रोडगे,काशिनाथ ब्रम्हराक्षस ,पंडित धायकर,किशोर धायकर,मानिक बनसोडे,गणेश हाकम ,ताहेर शेख,दिपक खुंडे, रामु ब्रम्हराक्षस,गुलाब धायकर, व गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते व कार्यक्रमांचे सुञसंचलन नितीन ब्रम्हराक्षस यांनी केले
