फ प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई!
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्र शासनाने मार्च, 2018 पासून एकल वापर प्लॉस्टिक पिशव्यांवर व थर्माकोलवर बंदी घातलेली असून विक्रेता अथवा ग्राहक यांचेकडे प्लॉस्टिक पिशव्या आढळून आल्यास पहिला गुन्हा रुपये 5 हजार दंड, दुसरा गुन्हा रुपये 10 हजार दंड अशा तरतूदी प्लॉस्टिक व थर्माकॉल बंदी अधिनियम 2018 मध्ये अंतर्भूत आहेत. प्लॉस्टिक पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रतिबंधित प्लॉस्टिक निर्मूलनाची कार्यवाही वेळोवेळी करण्यात येते. याअनुषंगाने फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी प्रभागातील प्रमुख आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांचे समवेत आज डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई केली. या कारवाईत एकुण 5 किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आदर्श स्विट मार्ट, डोंबिवली यांचेकडील प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांचेकडून रुपये 5 हजार दंड आकारण्यात आला.
