•सर्वसाधारण योजनेसाठी 5.25 कोटी, आदिवासी उपाययोजना 1.47 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 1.65 कोटी रुपयाच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता
अहमदनगर,दि.13: जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यासाठी एकुण रूपये 700.001 कोटी निधी प्राप्त झाला असून कोव्हिड -19 तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक आचारसंहितामुळे 234.55 कोटी रुपये (33.50%) एवढा निधी वितरीत करता आला यापैकी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेकरीता प्राप्त तरतुदीच्या 51.34 टक्के निधी वितरीत करण्यात आला असून सर्वसाधारण योजनेसाठी 5.25 कोटी, आदिवासी उपाययोजना 1.47 कोटी आणि अनुसूचित जाती उपाययोजना 1.65 कोटी रुपयाच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, आमदार लहु कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर बैठकीत दुरदृष्य प्रणालीद्वारे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार किरण लहामटे, आमदार रोहीत पवार, आमदार किशोर दराडे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमार्फत सन 2021-22 मध्ये कोव्हिड-19 संदर्भातील कामांसाठी आजपर्यंत 107.67 कोटी रुपये एवढ्या रकमेची कामे मंजुर करण्यात आली असून आवश्यकतेनुसार नविन कामे मंजुर करण्यात येतील. जिल्ह्यातील भुमिअभिलेख विषयक कामकाज गतिमान होण्यासाठी 10 रोवर मशिन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. सन 2021-22 मधील मंजुर नियतव्यय नुसार डिसेंबर 2021 अखेरपर्यंत सर्वसाधारण योजनेसाठी 260.67 कोटी रुपये, आदीवासी उपाययोजना 7.58 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना 28.96 कोटी रुपये असा एकुण 297.21 कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. मार्च 2022 अ
