नवगांव - इंदेगांव रस्त्याच्या दिड किलोमीटर डांबरीकरण कामाची (प्रथम ०:६००) सुरुवात
विहामांडवा,दि.17(किशोर धायकर,पैठण प्रतिनिधी): नवगांव - इंदेगांव रस्त्याच्या दिड किलोमीटर डांबरीकरण कामाची (प्रथम ०:६००) सुरुवात श्री विनोद (भाऊ) तांबे पाटील, अध्यक्ष पैठण तालुका काँग्रेस कमेटी तथा माजी सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आले.या प्रसंगी विहामांडवा गटाचे जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पल्लवीताई नवथर, ठेकेदार सतिश सितोळे,अन्सार पठाण, मा.सरपंच प्रभाकरराव दाभोळकर, मा.चेअरमन कलंदर मुकादम, हाजी यासीन, ताहेर पटेल, तात्यासाहेब भावले, निसार पठाण, विक्रम गवळी, मौलाना महेमुद, बाळु पा. चौधरी, मुख्तार पठाण, अविनाश चौधरी, मुख्तार साहेब, अख्तर पठाण, लहु पा.चौधरी, हाशम पठाण, अशोक चौधरी, नईम पठाण, युनुस शेख, आदी विभागातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. असे की गेल्या दहा बारा वर्षांपासून हिरडपुरी बंधाऱ्याच्या पाणी फुगवट्या मुळे नवगांव ते इंदेगांव हा रस्ता बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आल्यापासून येन शेती कामाच्याक्षणी माहे जुन ते फेब्रुवारी पर्यंत बंद होतो. परीणामी शेतकऱ्यांना शेतीच्या खरिप रबी हंगाम पिकअंतर्गत मशागत करण्यासाठी जाण्या-येण्यासाठी रस्ताच रहात नाहीत. ऊसाचे फड फेब्रुवारी मार्च पर्यंत कारखान्यास रस्ता अभावी टाकता येत नाही. त्यामुळे सदरील रस्त्यावरील पुलाचे काम प्रशासनाने तात्काळ सुरू करावे नस्ता तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असे सर्व उपस्थितांनी ठरवले। यावेळी श्री विनोद भाऊ तांबे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहाने नदीच्या ठिकाणी प्रतेक्षपणे स्थळ पाहणी केली.
