पैठण शहर व ग्रामीण भागातील अवैध मटका जुगार पत्ते क्लब बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांचे पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
पैठण,दि.5: पैठण शहरात व ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून अवैध मार्गाने मटका जुगार कल्याण/मुंबई/मधुर/ अशा अनेक प्रकारचे जुगार चालु आहेत, अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री पत्ते क्लब चालू असुन त्यामुळे तरुण गोरगरीब कष्टकरी देशोधडीला लागत आहे, विशेष म्हणजे कोरोणा परीस्थिती मुळे महाविद्यालय शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी देखील मटका जुगार अड्ड्यावर दिसून येतात , करीता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी मा, विशाल नेहुल यांना निवेदन देण्यात आले,नेहुल यांनी तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले , निवेदन देतानी सुनिल आडसुल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष,
