सामाजिक संघटना यांनी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनास-धुराजी शिंदे यांचा पाठिंबा
पिंपरी चिंचवड,दि.4: सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना यांनी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनास रिपब्लिकन सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष धुराजी शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात माता रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थींना मंजूर झालेले अनुदानाच्या चेक चे वाटप त्वरित करण्यात यावे यासाठी हे आंदोलन चालू आहे.
शहरात आज अनेक भागात वंचित शोषित व मागस असा समाज राहतो या समाजाला उन्नती करण्यासाठी व त्यांना हक्काची घरे उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने हि माता रमाई आवास घरकुल योजना सुरू केली आहे.या पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी महासचिव दत्ता भाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
