लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत नाकारल्यामुळे पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने आंदोलन.

0 झुंजार झेप न्युज

लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत नाकारल्यामुळे पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने आंदोलन.

पिंपरी चिंचवड,दि.5: पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पिंपरी - चिंचवड मातंग समाजाच्या वतीने साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत नाकारल्यामुळे संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले व राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते संदिपानजी झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणेत आले. यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करणेत आला. सामाजीक न्यायमंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते.. त्याचा संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतो. त्पाचे म्हणणे असे आहे की अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समावीष्ट केले नाही. अण्णा भाऊ साठे विज्ञानवादी, प्रयत्नवादी, वास्तववादी .विचाराचे लोकशा हीर , साहित्यीक, कामगार नेता , संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व होते . अण्णा भाऊ नी असे लिहून ठेवले आहे.की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कमगाराच्या श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे.म्हणून या मनूवादी संचालकाने आणाभाऊ चे नाव घेण्याचे नाकारले असावे. म्हणून या संचालकाचा व सामाजीक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करीत आहोत . या मंत्रालयाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत सामाविष्ठ करावे ही मागणी समाज बांधवांच्या वतीने करणेत आली. या आंदोलनामध्ये सर्वश्री भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे, नाना कसबे, संजय ससाणे, गणेश आडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाऊ आल्हाटसर, आबा भवाळ, हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे नितीन घोलप, मीनाताई कांबळे, मालनताई गायकवाड, नंदाताई कांबळे, मारूती दाखले, अक्षय दुनघव, आकाश शिंदे, प्रा, बी, बी. शिंदे, दुराजी शिंदे . उमेश हानवते, सतीश भवाळ, विट्ठल शिंदे, कल्पना कांबळे,चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, छबुताई कांबळे, दशरथ कांबळे, कैलास कसबे, इ. अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.