"यवतमाळचे पक्षी वैभव" पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

0 झुंजार झेप न्युज

"यवतमाळचे पक्षी वैभव" पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

यवतमाळ,दि.27: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वनविभाग यवतमाळ तर्फे प्रकाशित "यवतमाळचे पक्षी वैभव" या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री संदीप पानभुमरे यांच्या हस्ते काल बचत भवन येथे करण्यात आले. या पुस्तकामुळे पक्षीप्रेमी अभ्यासक व पर्यावरण प्रेमींना यवतमाळचे पक्षी वैभव आकर्षित करुण यवतमाळची नव्याने ओळख होईल व पर्यटनास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक अनंता डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम व पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ.प्रवीण जोशी उपस्थित होते. 

सदर पुस्तकात यवतमाळ तालुक्यासह लगतच्या अन्य सहा तालुक्यातील जलाशये माळराने झुडपी जंगले या अधिवासात आढळणाऱ्या स्थलांतरीत व स्थानीक असे 323 पक्ष्यांचे उत्तम छायाचित्र व त्यांचे संक्षिप्त वर्णन दिलेले आहे, सोबतच पक्षी आढळणाऱ्या जागांचा नकाशा दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे सुरवातीला पक्षांची शास्त्रीय सुची दिलेली आहे. या उपक्रमासठी पालक मंत्र्यांनी वनविभागाचे अधिकारी व लेखक प्रा.डॉ. प्रवीण जोशी यांचे अभिनंदन केले व भविष्यात असे प्रकारच्या अन्य उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.