पालकमंत्र्यांनी केले नंदोरी व कोरा महसूल मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

•गिरड दर्गा येथील विकास कामाची पाहणी

वर्धा,दि.27: जिल्हयातील सर्व महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील नंदोरी व समद्रपूर तालुक्यातील कोरा (पुर्नवसन) येथे 15 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन जिल्हयाचे पालकमंत्री तथा पशुसवंधन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी झाले. 

कार्यक्रमाला माजी आमदार राजु तिमांडे, तहसिलदार, राजु रणवीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, उपअभियंता श्री.गुंडतवार आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी नंदोरी व कोरा येथील महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या ईमारतीची पाहणी करुन कार्यालयास आवश्यक असलेले फर्णीचर साहित्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.  

गिरड येथील बाबा फरीद दर्ग्याला धार्मिक पर्यटन स्थळाची मान्यता मिळाली आहे. या धार्मिक तिर्थक्षेत्राचा विकास नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या वतीने करण्यात येत असून. सुरु असलेल्या कामाची पाहणी सुध्दा श्री केदार यांनी यावेळी केली. या धार्मिक पर्यंटन स्थळाला रोज नागरिक मोठया संख्येने येत असल्याने त्यांना पाणी, प्रसाधनाची चांगली सुविधा मिळावी यासाठी चांगल्या दर्जाचे बांधकाम करावे. त्याचबरोबर टेकडीवर येणा-या रस्त्यावर वाहतुकीची गर्दी होत असल्यामुळे रस्त्याच्या रुंदी करणाच्या बांधकामासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंता लीना उपाध्याय यांना श्री. केदार यांनी केल्या. 

यावेळी माजी आमदार राजु तिमांडे, उप वनसंरक्षक राकेश सेपट, कॉग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, गिरडचे सरपंच राजु नौकरकर बाबा फरीद दर्गा समितीच अध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.