राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले

0 झुंजार झेप न्युज

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले

नाशिक,दि.31: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. यादौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसर उपस्थित होते. यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.