बॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0 झुंजार झेप न्युज

बॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

भंडारा,दि.5: गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अधिग्रहीत न केलेल्या मात्र सध्या नुकसान होत असलेल्या जमीनीचे व पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सार्वजनिक व वैयक्तीक मालमत्तांचे नुकसान होत असलेल्या बाबींना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. संदीप कदम बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) अर्चना यादव-पोळ, अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे, शशांक जनबंधु, तहसिलदार निलीमा रंगारी, कार्यकारी अभियंता य. दु.मानवटकर उपस्थित होते.

संचय क्षमता तपासणीसाठी 1 नोव्हेंबरपासून पाणी पातळी वाढविण्यात येत आहे. यामुळे बॅकवॉटरचे पाणी काही भागात शिरले आहे. भुसंपादन न झालेल्या मात्र बॅकवॉटरमुळे बाधित होत असलेल्या शेतपिके व जमीनीचे नुकसान होत असलेल्या पिकांचा सर्वे महसूल यंत्रणेव्दारे करण्यात येईल. 10 जानेवारीपर्यंत पुर्ण संचय पातळी करण्यात येईल. त्यानंतर ड्रोनव्दारे सर्वे करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.