आवास योजनांच्या कामांना गती द्यावी प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

0 झुंजार झेप न्युज

•चांदूर बाजार शहरातील कामकाजाचा आढावा

अमरावती,दि.2: प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदुर बाजार येथे दिले.

चांदुर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत. आवास योजनांच्या कामांना गती द्यावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले. 

अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन झ नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.