पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विद्यमाने मुकाई चौक किवळे ते वाकड महामार्ग सेवारस्ता स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विद्यमाने मुकाई चौक किवळे ते वाकड महामार्ग सेवारस्ता स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन

पिंपरी चिंचवड,दि.8: महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी मुकाई चौक किवळे ते वाकड महामार्ग सेवारस्ता स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेत सेवारस्त्यावरील कचरा गोळा करुन स्वच्छता करण्यात आली. 

स्वच्छ भारत मिशनच्या पिंपरी चिंचवड शहर ब्रँड अम्बेसिडर सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, ब - प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त श्री. मंचक इप्पर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, ब्रँड अम्बेसिडर उत्तम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेची सुरुवात मुकाई चौक बस स्टॉप येथुन करण्यात आली. यावेळी बोलताना प्राजक्ता माळी यांनी स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्रीय सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करुन शहर स्वच्छतेमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे नमुद केले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आपले शहर राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर होण्यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले. शहरातुन जाणा-या या महामार्गाची जबाबदारी जरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असली तरी हे या शहराचे प्रवेशद्वार असल्याने तो स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वांनी एकत्र येवून हा रस्ता स्वच्छ करण्याचे नियोजन आज केले असल्याचे नमुद केले. प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वाचे स्वागत केले. प्लास्टिक बंदीस प्रोत्साहन देण्यासाठी महिला आर्थिक विकास मंडळाळाकडून कापडी पिशव्याचे वाटप यावेळी करण्यात आले. श्री. रामहरी साठे यांनी उपस्थितांना ‘’माझी वसुंधरा’’ ची शपथ दिली.

उपायुक्त संदिप खोत, सहा. पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, उमाकांत गायकवाड, उपअभियंता राजेंद्र इंगळे, श्री. काशिद यांचेसह, महिला आर्थिकविकास महामंडळाच्या अर्चना क्षिरसागर, सहा. पोलिस निरिक्षक (वाहतुक) श्री. पठाण, पोलीस उपनिरिक्षक (वाहतुक) श्री. शेख, श्री. राठोड, महापालिकेचे सहा. आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, एच.डी,एफ.सी. बँक चे प्रतिनिधी श्री. प्रफुल्ल, राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अशोक वरवत्तीकर, शिरिष रिंगे, ऑल इंडीया इन्स्टीट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पेलेडियम (CTO) यांचे प्रतिनिधी यांचेसह १५० पोलिस कर्मचारी, ३२५ महापालिका कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ४५ कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छतेमधुन निघालेला कचरा उचलणेसाठी ९ वाहने, ३ जेसीबी, ३ ट्रक्टर/ डंपर वाहने उपलब्ध करण्यात आली होती. यावेळी सुमारे १२ मे.टन कचरा गोळा करणेत आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.