पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ८९ कोटी ९४ लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ८९ कोटी ९४ लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता

पिंपरी चिंचवड,दि.16: महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे ८९ कोटी ९४ लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.पुणे महापालिकेसोबतच्या एकत्रित प्रस्तावानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प राबविण्यास, त्यासाठी पिंपरी चिंचवड हद्दीतील नदीच्या लांबीच्या प्रमाणात प्रकल्प सल्लागार यांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार सन २०२१-२२ च्या दरसुचीप्रमाणे येणा-या अंदाजपत्रकीय ७५० कोटी रुपयास आणि संभाव्य भाववाढ कलमानुसार होणारी वाढ व प्रकल्पांतर्गत करावयाच्या भुसंपादनासाठी आवश्यक रक्कमेसह येणा-या प्रत्यक्ष रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यास तसेच आवश्यकतेप्रमाणे प्रकल्पाची व्याप्ती व टप्पे निश्चित करण्यास आणि हा प्रकल्प आवश्यकते प्रमाणे कलम १०९ नुसार खाजगी सहभागातून विविध वित्तीय पुरवठाव्दारे निधी उभारण्याच्या धोरणास स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त यांना अंमलबजावणी प्राधिकारी म्हणून नियुक्त करुन यासाठी सक्षम प्राधिकारी समिती यांच्या मान्यतेने सर्व वित्तीय अधिकारासह निविदा मागवून प्रकल्प राबविण्यासाठीचे सर्व अधिकार देण्यास मान्यता स्थायी समितीने मान्यता दिली. अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे या विषयाची शिफारस करण्यात आली.महापालिका निवडणूक २०२२ करीता विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी ८६ लाख रुपये, प्रभाग क्रमांक १६ मध्ये मामुर्डी आणि किवळे मधील रस्त्यांची दुरूस्ती हॉटमिक्स पध्दतीने करण्यासाठी २६ लाख रुपये, प्रभाग क्र.१६ मध्ये डांबरी रस्त्याची दुरूस्ती हॉटमिक्स पध्दतीने करण्यासाठी २७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

अमृत योजनेअंतर्गत पिपंरी चिंचवड शहरातील उर्वरित ६० टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याचे काम चालु आहे. या भागातील जलकुभांच्या यांत्रिकीकरणाची कामे करणे आणि सध्याच्या स्काडा प्रणाली सोबत एकत्रीकरण करण्यासाठी ८ कोटी खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्र.३ च-होली, चोविसावाडी मध्ये विविध विभागामार्फत खोदण्यात आलेल्या ट्रेंन्चेसचे डांबरीकरण करण्यासाठी ५९ लाख रुपये, सांगवी किवळे रस्त्याचे व पदपथाची देखभाल दुरुस्ती व इतर स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी ९६ लाख रुपये, औंध - रावेत रस्त्यावर जुन्या समर्पित मार्गाच्या ग्रीलची दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ८० लाख रुपये, निगडी - दापोडी मार्गाचे सेवा रस्ते व फुटपाथची स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्ती कामे करण्यासाठी १ कोटी ५३ लाख रुपये,चिंचवड येथील ३० दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे चालन, देखभाल आणि दुरुस्तीचे कामे करण्यासाठी ३ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

प्रभाग क्र.१५ मधील पदपथांचे नुतनीकरण आणि दुरुस्ती करण्यासाठी ७२ लाख रुपये, काळेवाडी येथील पिंपरी पुल ते बी.आर.टी.एस.पर्यंतचा मुख्य रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी ४ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेच्या रस्ते आणि उद्यानांमध्ये लागवडीसाठी १ कोटी ४५ लाख रुपयांची शोभिवंत रोपे आणि मोठी रोपे खरेदी केली जाणार आहे. प्रभाग क्र. ४ मधील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे उच्चदाब आणि लघुदाब खांब व तारा हलविणे व विद्युत विषयक कामे करण्यासाठी ५२ लाख रुपये खर्च होतील.पिंपरी वाघेरे येथील जुनी ५ लक्ष लिटर क्षमतेची उंच टाकी पाडून नवीन उंच टाकी बांधण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपये, सेक्टर क्र २३ निगडी जलशुध्दीकरण केंद्र येथे टप्पा क्र. १ आणि २ साठी पी. ए. सी. टाकी उभारण्यासाठी ५५ लाख रुपये, विविध पंपगृहात आवश्यकतेनुसार जनित्र संच बसविण्यासाठी ५५ लाख रुपये, प्रभाग क्र.१३ मधील स्मशानभूमीयेथे पर्यावरणपूरक विद्युत दाहिनी तथा गॅसदाहिनी उभारण्यासाठी ३ कोटी ४३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.