विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ पथकाची घडक कारवाई

0 झुंजार झेप न्युज

विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ पथकाची घडक कारवाई 

जळगाव,दि.3: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्मानीय आयुक्त मा. श्री. कांतीलाल उमाप साहेब, संचालक अं. व दक्षता मा श्रीमती उषा वर्मा मॅडम, तसेच विभागीय उप आयुक्त श्री. अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक व अधीक्षक श्रीमती सिमा झावरे, यांचे गावठी हातभट्टी दारुचे मुळ उच्चटन करण्याचे आदेशानुसार माहे जानेवारी मध्ये भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात केलेल्या घडक कारवाईत विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ यांच्या पथकाने अवैध ढाबे, हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्रे, हातभट्टी दारु वाहतुक तसेच बनावट मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर छापे टाकून 42 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. त्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

34,200 -लिटर रसायन, 653-लिटर गावठी हातभट्टी दारु, 169.02 लिटर देशी मद्य, 72.16 लिटर विदेशी मद्य, 55.49 लिटर बियर,131.40 लिटर बनावट विदेशी मद्य, 01 ओमनी कार, 03 मोटरसायकल,वरील प्रमाणे एकुण रफ. 12,02,977/- किमतीची मुद्देमाल मिळुन आला असुन आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओ. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, राजेश सोनार दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, सत्यविजय ठेंगडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, यावल तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडली, गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक सुजि कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे हे करीत आहे.

तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भुसावळ कार्याल्याच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदव्उ, यावल व रावेर तालुक्यत या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री तसेच अवैध मद्यविक्री ढाब्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया सुरु राहतील असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ सुजित कपाटे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.