नवीन जलवाहिनीचे भूमिपुजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते

0 झुंजार झेप न्युज

नवीन जलवाहिनीचे भूमिपुजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते 

पिंपरी दि.14: चिखली-पाटीलनगर परिसरातील जलशुध्दीकरण केंद्रालगत ३० लक्ष क्षमतेची नवीन पाण्याची टाकीचे व चिखली ते डुडूळगाव या नवीन जलवाहिनीचे भूमिपुजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.भाजपाचे स्थानिक नगरसेवक तथा फ- प्रभाग समितीचे अध्यक्ष कुंदन गायकवाड व नगरसेविका स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर यांच्या प्रयत्नाने ही टाकी चिखली भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, अंकुश मळेकर, जितेंद्र यादव, संदीप शेलार, विनायक आबा मोरे, गणेश मळेकर, आनंदा यादव, कपिल म्हेत्रे, दिनेश यादव, सदानंद बग, उपअभियंता सयाजी गायकवाड, दीपक जाधव, तुषार हजारे, अभिषेक हरगुडे, संकेत मळेकर, राजू महाराज ढोरे, अमृत सोनवणे, पांडुरंग साने, यशवंत साने, गीतराम मोरे, सुनील लोखंडे, संतोष मोरे, कार्यकारी अभियंता टकले सो, नवनाथ भोसले, संतोष भांगरे, जालिंदर मोरे, खंडू मोरे, विष्णू नेवाळे, पांडुरंग मोरे, संतोष मोरे उपस्थित होते.

कुंदन गायकवाड यांच्या कार्याचे कौतूक…

नागरिकांना रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा परिपूर्णपणे देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रयत्नशील असने हे खऱ्या अर्थाने कोणत्याही लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव ठेवत आमचे नगरसेवक कुंदन गायकवाड हे कार्यरत आहेत, अशी कौतुकाची थाप आमदार महेश लांडगे यांनी यावेळी दिली.

पाण्याची चणचण कमी होणार : नगरसेवक गायकवाड

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या सहकारी नगरसेवकांच्या साथीने भरीव विकासकामे करण्यासाठी मी इच्छाशक्ती ठेवली त्याला जनतेच्या आशीर्वादाने यश आले.प्रभागाचा विकास हेच अंतिम ध्येय ठेऊन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मेहनत घेत आले आहेत. या नवीन जलकुंभामुळे उन्हाळ्यात पाण्याची चणचण नागरिकांना जाणवणार नाही. बहुतेक ठिकाणी महिला भगिनींना पाणी वापराची कसरत करावी लागते कारण साठवणक्षमता कमी असतील तर पर्यायाने अडचण निर्माण होते. अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही परिसराला पाणी पुरवणारे जलकुंभ किती आहेत? त्यावर वितरणाची व्यवस्था तग धरते. चिखली व पाटिलनगर परिसरात नवीन जलसाठा होणारी ही पाण्याची टाकी कामाचे समाधान देणारी आहे, अशा भावना नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.