दोन वर्षात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

1 झुंजार झेप न्युज

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार 

मुंबई,दि.28: राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न उद्धभवतो आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, ही योजना दोन वर्षात पूर्ण करा, असे निर्देश देत या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. निधी अभावी ही योजना रखडणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सोलापूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (व्हिसीद्वारे), महसूल विभागाचे अपरमुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिव शंकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर(व्हीसीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एकरूख तलाव पाणी पुरवठा योजना, भिमा नदी टाकळी पाणीपुरवठा योजना, उजनी जलाशय योजना या तिन्ही योजनांतून व्यवहार्य आणि खात्रीशीर स्त्रोत तपासल्यानंतर सोलापूर शहरास पिण्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आता निधी अभावी ही योजना रखडणार नाही. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, सध्याची 110 एमएलडी क्षमतेची योजना सुधारित करून ती 170 एमएलडी करताना सन 2035 ला सोलापूर शहराला लागणारे पाणी विचारात घ्यावे, सोलापूर सीटी डेव्हलेपमेंट कार्पोरेशन, महानगरपालिका, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी समन्वयाने काम करून या योजनेच्या कामाला गती द्यावी, ही योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. The best casino slots on the market, and what to
    Slots.lv · Microgaming 과천 출장안마 – Best Overall 경상북도 출장안마 Casino 통영 출장샵 · RTP · Software Review · Slots RTP · Games.lv · Slot 포항 출장마사지 Machine Selection · No Deposit 광양 출장샵 Bonus.

    ReplyDelete

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.