शासकीय कार्यालयात येतांना दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
यवतमाळ,दि.31: शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक व इतर संस्थांमध्ये कामानिमित्त येणारे दुचाकीस्वार नागरिक तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा तसेच इतर वाहन चालकांनाही हेल्मेट वापरासाठी प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालक तसेच वाहनमालकाविरूद्ध 4 एप्रिलपासून परिवहन विभाग व पोलीस विभाग यांचेकडून तपासणी करून मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई तसेच अनुज्ञप्ती निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल. हेल्मेट वापराबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिल्या आहेत.

