64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील,राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील,राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन 

सातारा,दि.5 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपट्टू उपस्थित होते. 

विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, महाराष्ट्रे केसरी कुस्ती स्पर्धा अंत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या कुस्ती स्पर्धेवर ग्रामीण भागातील कुस्ती प्रेमींचे लक्ष राहणार आहे. तरुण वयात मुले कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी तालमीत येतात आपल्या भविष्याचा विचार न करता कुस्ती खेळाशी निगडीत राहतात. वृद्धकाळात त्यांची प्रकृती चांगली राहिल व त्यांना मदत कशी मिळेल यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असून तरुण कुस्ती मल्लांचा शासनस्तरावर विचार करण्यात यावा.आज साताऱ्यात भव्य-दिव्य कुस्ती स्पर्धा आहेत. याचा तरुण मल्ल व माजी मल्लांसह मलाही आनंद होत असून याचा अभिामानही वाटत आहे. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी अंतिम लढत होत आहे. या लढतीसाठी मोठी गर्दी होणार आहे. याचे चांगले नियोजन करावे, असेही श्री. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राची मोठी पंरपरा आहे. ही परंपरा वृद्धींगत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बऱ्याच वर्षानंतर सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. कोरोना मुळे दोन वर्षात कोणत्याही स्पर्धा झाल्या नाहीत. सातारा येथे ही स्पर्धा होत आहे याचा रास्त अभिमान वाटत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात लहान-सहान गोंष्टीकडेही लक्ष देण्यात आले आहे. उत्तम नियोजन केले आहे. यामध्ये नागरिकांचीही बसण्याची चांगली सोय केली आहे. नागरिकांनी स्पर्धेसाठी सहकार्य करुन या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन केले आहे. या नियोजनामागे अनेकांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेला राज्य शासनाची सहकार्याची भूमिका राहिली आहे. या जिल्ह्यात अनेक नामवंत मल्ल झाले आहेत. यापुढेही नामवंत मल्ल तयार व्हावेत यासाठी तालीम संघाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातही निधी दिला जाणार आहे. कुस्ती क्षेत्रात भविष्यात साताऱ्याचा नावलौकीक करण्यासाठी जे काय करावे लागेल ते केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.यावेळी मान्यवरांनी आखड्यांमध्ये जावून मल्लांची कुस्ती लावून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ केला.या उद्घाटन कार्यक्रमास कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.