अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या समितीकडून रविंद्रसिंह कोली यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली

0 झुंजार झेप न्युज

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या समितीकडून   रविंद्रसिंह कोली यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली


पुणे,दि.30: अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समिती मध्ये पुणे येथील रविन्दर सिंह कोहली यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक दि.30/04/2022 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले.

महाराष्ट्रात माहिती अधिकार,मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे.सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली.या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.