कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली

0 झुंजार झेप न्युज

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली

सातारा,दि.26 : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी आज केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, प्रांतधिकारी सुनिल गाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

पाहणी प्रसंगी देसाई म्हणाले, कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठका झालेल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु झाल्यास स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौकाविहार सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहुनच योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच पाठविण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.