शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध..!
पैठण: वंचित बहुजन आघाडी पैठनच्या वतिने तहसिल कार्यालय व पैठण पोलिस स्टेशन यांना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे श्रध्देय अॅड. मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्यावर शिंतोंडे ऊडवुन व पैसे घेन्याचा सारासार बिनबुडाचा खोटा आरोप करुन बहुजनामधे दिशाभुल करुन श्रध्देय मा.बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करुन वंचितच्या भितीने सोकांमधे भ्रम निर्मान करन्याचा प्रयत्न केला आहे. तसेच श्रध्देय अॅड मा. बाळासाहेबांच्या नावाचा जो एकेरी ऊल्लेख व अरेरावीची भाषा वापरुन बदनामी करत आहे या विरोधात महाराष्ट्रातील तमाम बौध्द समाजात व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष बांगर वर तात्काळ कायदेशिर व कठोर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करन्यात यावा अन्यथा पैठण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तीव्र आसे आंदोलन छेडण्यात येईल आसे निवेदन पैठण पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालयाचे तहसिलदार निलावाड यांना देन्यात आले व आमदार बांगरच्या वक्तव्याचा तिव्र निषेध नोंदविन्यात आला या वेळी जिल्हा ऊपाध्यक्ष एस.डी. जाधव,जिल्हा सदस्य प्रभाकर ढोले तसेच तालुका ऊपाध्यक्ष संजय खडसन तालुका महासचिव राजेंद्र दौंडे,अतुल गिरी, शहराध्यक्ष ज्ञानदेव अडसूळ, तालुका सचिव कैलास बर्फे, तालुका सदस्य सुरेश वाव्हळ, शिवाजी मिसाळ सुनील साळवे,देवा अहीरे,गौतम पवार,जेष्ट कार्यकर्ते शेजव दादा,कल्यान गायकवाड, ईत्यादींची या वेळी उपस्थिती होती.

