विलास बापू भुमरे यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन
विहामांडवा(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): विहामांडवा येथे श्रीराम मंदिर परिसरामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन विलास बापू भुमरे यांच्या हस्ते दिनांक 2 मार्च 2022 शनिवार रोजी करण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, विहामांडवा सह संपूर्ण पैठण तालुक्यांमध्ये नवतरुण तडफदार विलास बापू भुमरे यांनी प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा ाहून आणणार्या चे चित्र निर्माण झाले आहे, तसेच त्यांनी नवतरुण निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे, कोणत्याही कार्यकर्त्यांनी समस्याची कल्पना देताच शनि त्या समस्येचे निवारण करण्याची विलास बापू भुमरे यांना चांगल्याप्रकारे खेळी जमली आहे.
पैठण तालुक्यांमध्ये सध्या सगळीकडेच विकासकामांना प्राधान्य देत असल्यामुळे विलास बापू यांनी आपली पकड मजबूत केली आहे, पैठण तालुक्यांमध्ये रोजच कुठे ना कुठे तरी विकास कामाचे उद्घाटन करण्याचा धुमधडाका त्यांनी चालू केला आहे. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालत असल्यामुळे त्यांनी तालुक्यामध्ये त्यांच्या परिचयाचे खूप मोठे जाळे पसरले आहे. त्यांनी विहामांडवा परिसरात विकास कामाचे उद्घाटन करून दि २ मार्च २०२२ शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विहामांडवा येथील श्रीराम मंदिर परिसरामध्ये पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन करून, अनेक विकास कामे करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे, यावेळी पंचायत समिती सदस्य लहु पा. डुकरे, नाना पा. डुकरे, किशोर चौधरी, विवेक तुपकरी, श्याम तुपकरी, बापू निकम ,नितीन पा. तांबे, पांडुरंग भिंगारे, बाळासाहेब पन्हाळकर, सुनील डुकरे, पांडुरंग पवार, बप्पासाहेब येळे, प्रभाकर आवारे,रामा बोडखे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती,

