पावसाचे पाणी जमीनीत साठवण्यासाठी नियोजनपुर्वक उपययोजना करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जलसंधारण विभागाला सूचना

0 झुंजार झेप न्युज

 जल शक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ मोहिम राबणार

 जलसंधारण कामाचा आराखडा मंजूरीसाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन 

यवतमाळ,दि.04: संपुर्ण देशात ‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ हे अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने जिल्ह्यात जेव्हाजेव्हा पाऊस पडेल त्या प्रत्येक वेळी पावसाचे पाणी जमीनीत साठवता यावे यासाठी नियोजनपुर्वक उपययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज यंत्रणेला दिल्या असून सर्व नागरिकांनी जलशक्ती अभियानात सहभागी होऊन या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.जल शक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज महसूल भवन येथे आज घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुडधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संगीता राठोड, जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदिप कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी नरेगामधून जलसंधारण, वृक्षरोपण व शोष खड्डे घेण्याचे तसेच सर्व शासकीय इमारती, अंगणवाडी व शाळेत रेन वॉटर हार्वेस्टींग व वृक्षारोपण करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्याचे व विद्यार्थ्यांना जलशपथ देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व नगरपालीकांनी वृक्षारोपण करण्याचे तसेच नगरपालीका क्षेत्रात बांधकामाची परवानगी देतांना रेन वाटर हार्वेस्टींग करण्यात येत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

या अभियान कालावधीत जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून पेसा क्षेत्र वगळता इतर सर्व ग्रामपचायतीमध्ये 5 एप्रिल रोजी ग्रामसभा ठेवण्यात आली आहे. त्यात गावातील जलसंधारण कामाचा संरचानात्मक आराखडा मंजूरीसाठी ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. वन विभागाने सर्व विभागांत वृक्षरोपण करण्याचे तसेच शासकीय जमीनीवर गैरसरकारी संस्थांच्या मदतीने (एन.जी.ओ.) घनवन लागवड करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

जलसंधारण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर ‘कॅच द रेन’ अभियानाचे उद्धाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या 29 मार्च रोजी करण्यात आले होते. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी 28 मार्च रोजी बैठक घेवून सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. हे अभियान 22 मार्च जलदिनापासून सुरू झाले असून सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे कार्यालयात जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड यांनी सादर केली.बैठकीला पाटबंधारे प्रकल्प, जनसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इत्यादी विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.