रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 34जखमी

0 झुंजार झेप न्युज

अपघातग्रस्तांचा मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली

रायगड,दि.08: रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 34जखमी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस 8 मे 2022 रोजी आठच्या सुमारास साठ फूट खोल दरीत कोसळली आहे.

प्रशासनाने जाहीर केल्यानुसार या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 34 जण जखमी झाले आहेत.खमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे.

अपघातग्रस्तांचा मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली आहे. सर्व यंत्रणा तात्काळ मदातकार्यास लागली आहे.नालासोपारा येथून एक खाजगी बस निघाली होती. तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे, MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात झाला आहे.ही बस पुलावरुन 60 फूट खाली कोसळली. 

प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.