दुर्गम भागातील गावाना मुख्य रस्त्याने जोडणार-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

0 झुंजार झेप न्युज

दुर्गम भागातील गावाना मुख्य रस्त्याने जोडणार-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पालघर,दि.8: जिल्ह्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत या मध्ये रस्ते व आवश्यक असेल तेथे पूल बांधणे गरजेचं असल्यामुळे त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यातील दुर्गम भाग मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे पर्यावरण पर्यटन,मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावाना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार सुनिल भुसारा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिह कार्यकारी अभियंता माधवराव शंखपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुर्गम असल्यामुळे दळण - वळणाचा मुख्य स्रोत रस्ते व पूल येथे उपलब्ध झाले नाहीत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार अशा दुर्गम भागाना मुख्य रस्त्याने जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधव, व स्थानिक नागरिक यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. असेही श्री ठाकरे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.