एकमेकांना सहकार्य करून मानवतेचा परिचय वृध्दींगत करावा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

0 झुंजार झेप न्युज

रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळोवेळी रक्तदान करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.8: आपत्तीच्या परीस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य करून मानवतेचा परिचय वृध्दींगत करावा, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व रेड क्रॉस सोसायटी यांच्या द्वारे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधर, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे, रेडक्रॉसचे जनरल सेक्रेटरी जलालउद्दी गिलाणी, कोषाध्यक्ष देविदासजी गोपलानी, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगिता राठोड, प्रा. धनश्याम दरणे इ. मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की आपण केलेल्या रक्तदानातून गरजू रूग्णांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी शासकीय रक्तपेढीवर रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की कोरोना काळात विविध संघटनांनी सहकार्य केल्यामुळे आपण फार मोठ्या आपत्तीवर मात करु शकलो. यामध्ये रेडक्रॉसचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. रेडक्रॉसचे कार्य सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सुरवातीला जागतिक रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने रेडक्रॉस भवन यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या भवनाच्या बांधकामासाठी मदत करण्यात येईल असे ते म्हणाले. 

जिल्हाधिकारी यांचे सोबत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, तहसिलदार कुणाल झाल्टे, नायब तहसिलदार रुपाली बेहरे, मनिषा चव्हाण, प्राचार्य अविनाश शिर्के, अॅड. सिमा लोखंडे, अॅड. धनंजय लोखंडे, डॉ. अजय लाड यांचेसह २०३ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. सर्व रकत्दात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. रक्त संकलन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुने केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदकुमार बुटे यांनी केले. तर रेडक्रॉसच्या कार्याची माहिती जलालुद्दीन गिलाणी यांनी दिली. सूत्रसंचलन रक्तदान शिबीराचे प्रकल्प अधिकारी डॉ. अजय लाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले.

 कार्यक्रमाच्या याश्स्वीतेसाठी डॉ. विनोद भोंगाडे, डॉ.सि.बी.अग्रवाल, नगर पालिका प्रशासनाचे डॉ. विजय अग्रवाल, निमा संघटनेचे डॉ. राखुंडे, डॉ. डेहनकर, उद्योजक राजुभाऊ निवल, डॉ. विजय कावलकर, डॉ. हातगावकर, प्राचार्य अविनाश शिर्के, मंगेश वैद्य, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सतिष मून, संजय हातगांवकर, के. बी.यादव, विलास पंचबुध्दे, रत्नदिप मेश्राम, किशोर येंडे, गोपाल गायकवाड, नरेंद्र उके, सचिन परचाके, विजय खडसे, रेमंड युको डेनिम, सारा स्पींटेक्स इंडिया लि., रविराज इंडस्ट्रिज, वाधवाणी फार्मसी कॉलेज, अमोलकचंद महाविद्यालय एन.सी.सी. कॅडेट्स, राज्य कर्मचारी संघटना, महसूल संघटना, एन.एस.एस.विद्यार्थी, तहसिल कार्यालय, वणी, मारेगांव, केळापूर, दारव्हा, दिग्रस, नेर, यवतमाळ, पटवारी संघटना व कोतवाल संघटना व इतर सर्व सामाजिक संस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.