पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0 झुंजार झेप न्युज

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड दि.04: पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ बनसोडे यांनी 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यावेळी आमदार बनसोडे यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक यांनी बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेली 2 वर्ष कोव्हिडच्या कठीण काळात आमदार बनसोडे यांनी वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी जनसामान्य लोकांना मदत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.परंतु आज सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, नगरसेवक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांनी आमदार बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, नगरसेवक शाम लांडे,राजु मिसाळ,डब्बू आसवानी,प्रसाद शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छुकांचे आभार व्यक्त करताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, वाढदिवसानिमित मला कार्यकर्ते, मित्र मंडळी, नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष येऊन फोन मेसेजद्वारे, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.