रायगड जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

0 झुंजार झेप न्युज

रायगड जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

रायगड,दि.6: रायगड जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती.उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प.) श्री राजेन्द्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री निलेश घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री.नितीन मंडलिक, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुनीता पालकर , सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. सुदीप बुधले, श्री.अशोक कुकलारे, श्री.पराग खोत, श्री.निलेश वाबळे,श्री.सुरेश पाटील व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.